Thursday, March 10, 2011

थेंब अश्रुंचे दोन गालावरती..


थेंब अश्रुंचे दोन गालावरती..
कसे पुसायाचे राहून गेले..
लपविलेले दु:ख माझे
चार चेहरे पाहून गेले..
.
.
सांगितले बरेच काही..
आनंदाश्रु अन काही बाही..
अर्थ सुकल्या आसवाचा परी
लावायचा तो लावून गेले..
.
लपविलेले जे दु:ख माझे
चार चेहरे पाहून गेले..

पुसले डोळे.. हसून खोटे
चाचपले कितिक मुखवटे
मुखवट्याला चेहर्‍यावरती
चढवायाचे आज राहून गेले
.
लपविलेले जे दु:ख माझे
चार चेहरे पाहून गेले..

हसून आता.. विसरून सारे
वावरते जणू.. उनाड वारे
हसताना पुन्हा भरले डोळे
पापणीतून अश्रु वाहून गेले
.
लपविलेले जे दु:ख माझे
चार चेहरे पाहून गेले..
.
.
थेंब अश्रुंचे दोन गालावरती..
कसे पुसायाचे राहून गेले..
लपविलेले दु:ख माझे
चार चेहरे पाहून गेले..

अपुर्ण प्रेम

माझ प्रेम कधी कळल नाही तुला,
म्हनुनच कायमचा सोडून गेलास मला,

मी वेड्यासारखी प्रेम करत राहिले तुझ्यावर,
आणि तुही जिवापाड प्रेम केलास माझ्यावर,

पण का, का? कधी विचारल नाहीस मला,
माझ्या नकाराची भिती होती का तुला?

तुझ माझ प्रेम हे दोघांच्या मनात फुलत राहिल
दोघान्चही एकमेकांवर प्रेम असुनही अपुर्णच राहिल, 

आणि आता ते कायमच राहिल अपुर्णच
कारण तुझ्याशिवाय मी पण अपुर्णच...

कधीतरी वाटत यार आपलंही कुणी असावं...

ह्या खांद्यावर डोकं ठेऊन तिला रडावसं वाटावं
ज्या स्वप्नांमध्ये माझ्या सगळ्या रात्री जगतात
त्या स्वप्नांमध्ये हरवून तिलाही जगावंसं वाटावं....
माझे आसू पुसून तिने आमच्या सुखात हसव..
कधीतरी वाटत यार आपलंही कुणी असावं...

छोट्या छोट्या गोष्टीमध्ये खोटं खोटं चिडाव पण ...
भेटीनंतर निघते म्हणताना तिचा पाऊल अडावं
बाकी सगळ्या जगाचा पडेलच विसर तेव्हा...
तिने माझा प्रेमात अगदी आकंठ बुडावं...
ह्या छोट्याशा स्वप्नानं एकदाचं खरं व्हाव ....
नेहमीचा यार वाटत..... आपलंही कुणी असावं...

कोणीतरी आपलं

वाटत कधी कधी कोणीतरी आपलं असावं
जिच्यासोबत राहून माझं आयुष्य सुंदर खुलावं

तिचा चेहरा दिसल्यावर सारे tensions दूर व्हावेत..
अन तिचे रूप पाहून...मी तिच्यात हरवून जावं..

माझ्या चेहऱ्यावर वाऱ्याने त्या उडणाऱ्या मोकळ्या तिच्या बटांमध्ये,
हरवून जावं कधीतरी मी त्या लाटांच्या आवाजामध्ये...

किनाऱ्याच्या त्या वाळू मधुनी..
त्या सागरात बुडुनी सूर्यास्ताला पाहत... व्हावं एकरूप दोघांनी

मी सुद्धा घ्यावा तिचा मग हातात हात,
तिने सुधा द्यावा लगेच हसत गालातल्या गालात..

कधी सैल न व्हावा घट्ट धरलेला माझा हात..
आयुष्यभर द्यावी तिने मला साथ ..

आठवण माझी आली कधी तर

आठवण माझी आली कधी
तर पापण्या जरा मीटून बघ.
सरलेल्या क्षनान्म्धले
संवाद जरा आठवून बघ.

आठवण माझी आली कधी
तर त्या वाट वळणाऱ्या वाटेवर बघ
त्या पाउल वाटेवरती
उमटलेली आपली पाउले बघ.

आठवण माझी आली कधी
तर उडणार्या पक्षांकडे बघ.
त्यांच्यासारखाच माझ मन
तूज्याकडे धावत आलेलं बघ.

आठवण माझी आली कधी
तर चांदण्या जरा मोजून बघ.
चांदण्या रात्री घेतलेल्या शपथेचा
शब्द न  शब्द आठवून बघ.

आठवण माझी आली कधी
तर सागरकिनारी जाऊन बघ.
हजारदा किनार्याला मीठीत  घेऊन सुद्धा
परतणाऱ्या नीराश  लाटेच  वीव्ह्लन बघ.

आठवण माझी आली कधी
तर साद मला घालून बघ
तुझ्या अवतीभोवती फीरणार
माझ अस्तित्व जरा जाणवून बघ.

प्रेम

प्रेम उमजून समजून जाणून करता आल असत
तर किती बर झाल असत ..........
निदान प्रेमासाठी प्राण देणाऱ्या प्रेमिकांच
अर्थहीन मरण टळल असत ..........
फक्त नजरेला नजर मिळाली म्हणून
प्रेम व्यक्त केल गेल नसत ...........
हृदय विनाकारण चुकीच्या हातात
खेळण्यासारख दिल गेल नसत ....
प्रेमाच्या नावाखाली बरचस चुकीच
बाजारात विकल गेल नसत ...........
प्रेमाला जिवापेक्षा जास्त महत्व
कधीच प्राप्त झाल नसत ............
प्रेमात आणि युद्धात सार क्षम्य असत
अस म्हंटल गेल नसत ..........
दोन्हीत मरणाच्या शक्यतेला गृहीत
कधीच धरल गेल नसत ...........
एखाद प्रेम न जाणणार प्रेमळ हृदय
प्रेमाचाच बळी ठरलं नसत ..........
प्रेमासाठीच प्रेम जगात या बदनाम
चुकुनही कधी ठरलं नसत .............

तुला प्रेम करणे जमलेच नाही...

तुला प्रेम करणे जमलेच नाही
आणि मला ते व्यक्त करणे

मी वाट पाहिली तुझ्या येण्याची
तुला वाट पाहणे जमलेच नाही
आणि मला तुझ्या वाटेवर चालणे...

मी खूप एकटा होतो तुझ्याविना
तुला साथ देणे जमलेच नाही
आणि मला तुझी साथ मागणे...

मी गुंतत चाललो होतो तुझ्यात
तुला हे गुंतणे समजलेच नाही
आणि मला ते तुला समजावणे...

मी प्रेमात पडलो खरा तुझ्या
तुला या नात्याचा अर्थ कळलाच नाही
आणि मला त्याचा अर्थ सांगणे...

माझ्यातला तू....

साखरझोपेत मी पहाटे पहाटे,
अन झुळझुळला थंड वारा....
गेला घालून साद कानी,
चेहरा तुझा हसरा....
बावरलेल्या नयनांनी,
पाहता मी दर्पणी,
माझ्याच प्रतिमेत,
दिसलास तू....
हसलास तू....
घेता मी हाती,
प्याला गरम चहाचा,
भिंतीवरच्या चित्रामध्ये,
दिसलास तू....
हसलास तू....
उन्हं कोवळे वाट एकली,
तव पावलांची चाहूल लागली,
पलटून पाहता माझ्या सावलीत,
दिसलास तू....
हसलास तू....
सांजवेळी येता तुझी आठवण,
निसर्गास सारे सांगते गुपित,
सोनेरी लालसर आभाळात,
दिसलास तू....
हसलास तू....
चांदरात्री स्वैर फिरताना,
जाहला हाकेचा आभास,
शीतल चंद्रात त्या.....
दिसलास तू....
हसलास तू....
स्वप्नात भेटण्या तुजला,
जीव माझा व्याकुळला,
मिटताच पापणी हळुवार...
दिसलास तू....
हसलास तू.... 
लपंडाव खेळशील किती रे?
असा मला छळशील किती रे?
निरागस प्रश्नास उत्तरण्या,
हसलास तू....
लपलास तू....

तुझी आठवण

ना, तू, ना, मी
ना आपण
काहीच नाही राहिले
भूतकाळात सारे असेच घडून गेले
राग होते, रूसने होते
सारे काही फसवे होते
माझ्या फजेतीवर
सारेजण हसले होते.
भविष्य काळातील स्वप्नं सारी
उध्वस्तं होत चालली आहेत
एका मागून एक असं विचित्र घडत आहे.
कधी असं झालं तर,
स्वतःला मी सावरत असतो.
आपल्या बरोबर कुणीच नाही, म्हणून मन ही रडत असतं
अश्रूही थांबत नाही
ते आपली वाट मोकळी करतात
स्वतःचे दुःख ते माझ्या नेत्रातून सांडतात
येवढं मात्र खरं
ते फक्त तुझीच आठवण काढतात...

माहित नाही का?

कोणाला तू आवडत नसलास
तरी मला का खूप आवडतोस?

नयनी तुझीच स्वप्ने,
ओठांवर तुझेच नाव,
मनात तुझेच विचार,
आजकाल हे रे असे का?

प्रेमाची हि नशा असावी कि
ह्याला तुझीच जादू म्हणावी?

ओढ तुझ्या प्रीतीची मला
स्वस्थ बसू देत नाही,
कामात हि आजकाल का
कुठेच लक्ष लागत नाही?

आपली सगळी परकी वाटतात
आणि तूच का आपलासा वाटतोस?

पण तुला कळत नाही
माझ्या हृदयाचे दु:ख,
कारण बघावं तेव्हा तू तर
असतोस आपला रुक्ष.

चल ये ना आणि मला तुझ्या कुशीत घे,
नेहमीच्या त्या आपल्या स्वप्नांच्या नगरीत ने....

मी काहीसा ......

    ठेवून मनाच्या कोपरयात तुला
                                                      जगलो मी काहीसा
                                                      नाही तू माझीच म्हणत
                                                      जगाशी खोटं बोललो मी काहीसा ........

क्षणा क्षणाला तुला आठवून
तळमळलो मी काहीसा
नाही हक्क तुझ्यावर माझा
म्हणून हळहळलो मी काहीसा ............

देवाजवळ ओंजळ पसरून मागताना
मागितले तुझे प्रेम काहीसे
तरीही पदरात पडले नाही माझ्या
म्हणून रडलो मी काहीसा .........

प्रवास संपला आता
पण सांगू न शकलो काहीच तुला
जातानाही तुझ्याच तास्वीरीकडे पाहून
'माझे प्रेम '......पुटपुटलो काहीसा.......
:(

मन नसत तर किती मज्जा आली असती...


मन नसत तर किती मज्जा आली असती
सुख-दुःखाची कसली जाणीव झाली नसती

विचारांच्या चक्रात कोणी गुरफटल नसत
हूकूमशाहीच्या मनावर कोणी राज्यच केल नसत
रूसव्या फुगव्याच्या गर्दीत कधी कुस्तीच झाली नसती
मन नसत तर किती मज्जा आली असती

फुलपाखरू बनून कधी बागडलच नसत
गजबजलेल्या वस्तीत कोणी घुसमटच नसत
भावनांची शाल पांघरून केली नसती मस्ती
मन नसत तर किती मज्जा आली असती

सागराच्या प्रवाहाबरोबर वाहून गेल नसत
चलबिचलता अंगी बाणून खेळत बसल नसत
प्रत्येक क्षणाला रंग दाखवून केली नसती सक्ती
मन नसत तर किती मज्जा आली असती
मन नसत तर किती मज्जा आली असती........... :(