Saturday, March 12, 2011

तू सूर बनून याव...

तू सूर बनून याव,
तू ताल बनून याव,
आयुष्यातलं तू माझ्या,
सुरेल गीत बनून याव.

शब्दात तुला मी
कधीच उतरवणार नाही,
पण तू मात्र माझ्या ओठावरचे,
शब्द बनून याव.

चंद्र-सूर्य नको मला,
खोटी आश्वासन अन,
आशाही नको.
तू फक्त आयुष्यात माझ्या,
एक आधार बनून याव.

जगण्यासाठी धडपडू दे मला.
उन-वारा-पाऊस पाणी हि सहन करू दे.
पण.............
आशा वेळी तू फक्त माझी
हिम्मत बनून याव.

जगण्यासाठी धडपड करेन मी,
हसत हसत जखमाही झेलेन.
पण तू फक्त त्या जखमांवर,
प्रेमाने फुंकर घालायला याव.

स्वप्न पूर्ण होत नाही,
आस पूर्ण होत नाही.
पण तू मात्र माझ,
अस्तित्व बनून याव.

सावली बनून माझी
सदैव सोबत राहावं.
आयुष्यातलं तू माझ्या,
सुरेल गीत बनून याव.
आयुष्यातलं तू माझ्या,
सुरेल गीत बनून याव.
गौरी कुलकर्णी,नागपूर कडून मिळालेली एक छान कविता...  

काही प्रेमळ व्याख्या...

   पूर्वा पाठक,अहमदनगर कडून मिळालेली एक छान कविता.....